Ticker

    Loading......

बेवारस- गहाळ झालेली वाहने कागदपत्रे दाखवून घेवुन जाण्याचे किनवट पोलीस निरक्षकांचे आवाहन


बेवारस- गहाळ झालेली वाहने कागदपत्रे दाखवून घेवुन जाण्याचे किनवट पोलीस निरक्षकांचे आवाहन

किनवट:( तालुका प्रतिनीधी ) 
     

    किनवट पोलीस स्टेशन येथे बेवारस व गहाळ झालेल्या 7 दुचाकी व 1 टॅक्टर हेड असे एकूण 8 वाहने जप्त करण्यात आले असून 

संबंधित वाहन मालकांनी ओळख पटवून व गाडीचे सर्व कागदपत्रे दाखवून वाहने 15 

दिवसात घेवुन जावे असे आवाहन किनवट पोलीस स्टेशनच्या वतीने प्रसिद्ध पत्रकाद्वारे केले आहे. 
     

 गेल्या अनेक महिन्यांपासून  पोलीस स्टेशन किनवट येथे विविध प्रकारच्या वाहने जप्त करण्यात आली आहेत.

 यामध्ये हिरोहोंडा स्प्लेंडर, ग्लॅमर, बजाज डिस्कवर, पल्सर, ट्रॅक्टर  हेड अशा एकूण 8 वाहने आहेत.

 ही वाहने चोरीस किंवा गहाळ झाल्यास कागदपत्र दाखवून ओळख पटवून  वाहने घेऊन जावे. 

जर  कोणत्याही वाहनाचे कागदपत्र आले नाही  तेव्हा वाहन कोणाचेच मालकीचे नाही असे 

अथवा बेवारस  समजून मा.  न्यायालयाच्या आदेशान्वये  त्यांच्या जाहीर लिलाव करण्यात येईल  याची नोंद घ्यावी. 

अशा प्रकारचे आवाहन  पोलीस निरीक्षक मारोती थोरात, पोलीस उपनिरीक्षक गणेश पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक शेख चांद यांनी केले आहे.