*बंद.... बंद... बंद... किनवट बंद..!*
*पहलगाम येथे झालेल्या भ्याड आतंकवादी हल्ल्याचा तीव्र निषेध*
भारतीय जनता पक्ष, शहर मंडळ किनवट तर्फे काश्मीरमधील पहलगाम येथे निष्पाप नागरिकांवर करण्यात आलेल्या भ्याड आतंकवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात येतो. या हल्ल्यात झालेल्या निष्पाप नागरिकांच्या हौतात्म्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर, भारतीय जनता पक्ष, शहर मंडळ किनवट यांच्या वतीने दिनांक 25 एप्रिल शुक्रवार रोजी किनवट शहर बंदची हाक देण्यात येत आहे.
सर्व व्यापारी, व्यावसायिक, संघटना व नागरिकांनी यामध्ये स्वेच्छेने सहभाग घेऊन एकात्मता व देशप्रेमाचे दर्शन घडवावे, ही विनंती.
जयहिंद! वंदे मातरम!
विनित:
*स्वागत केशवराव आयनेनीवार*
किनवट शहर मंडळ अध्यक्ष
*उमाकांत पाटील कराळे*
किनवट उत्तर मंडळ अध्यक्ष
*सूर्यकांत अरंडकर*
किनवट दक्षिण मंडळ अध्यक्ष