Ticker

6/recent/ticker-posts

किनवट :अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रीशताब्दी समारोहाची सांगता किनवट विधानसभेचे आ. भीमराव केराम यांच्या मार्गदर्श


किनवट :(प्रतिनीधी) 
अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रीशताब्दी समारोहाची सांगता किनवट विधानसभेचे आ. भीमराव केराम यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख  यांच्या  उपस्थितीत किनवट शहर तालुका अध्यक्ष स्वागत आयनेनीवर आयोजीत शहरातील शिव मंदिरात शनिवारी सकाळी 10 वाजता महाआरतीने झाली. यावेळी  महिलाच्या  वतिने किनवट येथील शिवमंदिरात महापूजा करून शिवआरतीने जयंती साजरी करण्यात आली. तर  शालांत प्रमाणपत्र परीक्षेत तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या कुमारी अक्षरा आशिष देशपांडे हया विद्यार्थींनीचा शाल, पुष्पगुच्छ, बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला. भारतीय जनता पार्टीच्या वतिने सर्वत्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त शिव आरती चे आयोजन करण्यात आले होते. याचाच एक भाग म्हणून किनवट शहरातील पैनगंगातिरी  शिवमंदिरात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 
        या वेळी  सुधाकर भोयर,  माजी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, बाबुराव केंद्रे, राघू मामा, दत्ता आडे, संजीव रेड्डी, आशीष देशपांडे, बाळकृष्ण कदम, नविन राठोड़, विश्वास कोल्हारीकर, शिवाजी आंधळे, मारोती भरकड, अजय चाडावर, बालाजी धोत्रे, संतोष चनमणवार, रवि चव्हाण, मधुकर अन्नेलवार, शिवा क्यातमवार, जयराज वर्मा,  राजेंद्र भातनसे, मुकुंद नेम्मानीवार, गंगुताई परेकार, पूनमताई दीक्षित, सागरताई शिंदे, भावनाताई दिक्षित, इंदूताई कन्नाके, प्रभावती गुरे, नरेश सिरमनवार, गजानन मुंडे, सतीश बिराजदार, जगदिश तिरमनवार, सुरेश साकपेल्लीवार, राहुल दरगुलवार,  नरसिंग टक्कलवार, कृष्णा इटकेपेल्लीवर, राजेंद्र जयस्वाल, कृष्णा कालकुंतावर,शंकर मानकर, मनोज जाधव, शिवाजी काळे,राघवेंद्र जयस्वाल, शंकर निळावर,विक्रांत दग्गुलवार आदी मान्यवर उपस्थित होते.