Ticker

6/recent/ticker-posts

पक्षाने उमेदवारी दिल्यास संधीचे सोने करू...-जनतेच्या साथी ने निवडणूक जिकणार;पत्रकार आनंद भालेराव यांच्या एन्ट्री ने इच्छुकात

पक्षाने उमेदवारी दिल्यास संधीचे सोने करू...

-जनतेच्या साथी ने निवडणूक जिकणार;पत्रकार आनंद भालेराव यांच्या एन्ट्री ने इच्छुकात खळबळ ..

किनवट/प्रतिनिधी:   राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे फाऊंडर सदस्य असलेले कै.प्रदिप नाईक व माजी मंत्री सुर्यकांता पाटील,माजी मंत्री माधवराव किन्हाळकर व पक्षाच्या नेत्या मा.बेबीताई प्रदीप नाईक,कपील नाईक यांचे विश्वासु सहकारी म्हणून अनेकवर्षं काम पाहिलेले पक्षाचे माजी युवा अध्यक्ष,पत्रकार आनंद भालेराव हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील आहेत.
गोकुंदा पंचायत समितीच्या सदस्यपदा साठीची निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे.कारण किनवट पंचायत समितीचे सभापतीपद (sc) सर्वसाधारण प्रवर्गासाठी  सुटले आहे.त्यासाठी इच्छुकांचीही गर्दी वाढू लागली आहे. भाजपा, शिवसेना उबाठा, शिवसेना,राष्ट्रवादी (sp),राष्ट्रवादी (ap),काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी,कम्युनिस्ट पक्ष, मनसे, समाजवादी पक्ष,AMIM,संभाजी ब्रिगेड व इतर पक्षाचे तगडे उमेदवार या निवडणुकीत आपापल्या ताकतीने निवडणूकित उतरणार आहेत.
   पत्रकार आनंद भालेराव हे उच्चशिक्षित,प्रेमळ, मितभाषिक,नागरिकांच्या समस्यांची जाण असणारे व पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वदूर परिचित आहेत.त्यांनी गोकुंदा परिसरातील व किनवट/माहूर तालुक्यातील अनेक समस्या सोडविण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून आवाज उठवून प्रशासनाला जागृत केले आहे. 
     1999 पासून म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापने पासून माजी आमदार कै. प्रदीपजी नाईक व माजी मंत्री श्रीमती सुर्यकांता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी काम केले आहे.        
त्यांना या पक्षाच्या माध्यमातून अनेक शासकीय कमिट्यावर काम करायची संधी उपलब्ध झाल्यामुळे त्या माध्यमातून  गोरगरीब जनतेची सेवा करण्याची साठी मिळाली होती.संजय गांधी निराधार योजना,ग्रामीण रुग्णालय गोकुंदा,जिल्हा पुरवठा समिती,दक्षता समिती अश्या वेगवेगळ्या समितीच्या माध्यमातूनही जनतेची सेवा केली आहे.
  सध्या एक पत्रकार संघाचे मराठवाडा संपर्क प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत किनवट टुडे न्युज च्या माध्यमातून जनतेच्या समस्या प्रशासनासमोर मांडण्याचे काम आम्ही करीत आहेत.
  उच्च शिक्षित व अनेक वर्षांच्या राजकिय, सामाजिक कार्याच्या व अनुभवाच्या जोरावर मी जनतेची सेवा करू शकतो असा माझा दृढ विश्वास आहे.यापूर्वी मी 2 वेळेस नगरसेवक व 1 वेळेस पंचायत समिती निवडणूक लढविली होती. परंतु अल्पमताने माझा पराजय झाल्यामुळे मला अद्याप लोकप्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली नाही.तेव्हा पक्षाने येणाऱ्या स्वराज संस्थेच्या निवडणुकीत गोकुंदा गणातून  उमेदवारी दिल्यास परिसराचा विकास घडवून आणीन असेही पत्रकार श्री आनंद भालेराव यांनी आमच्या प्रतिनिधी जवळ बोलतांना सांगितले.