Ticker

    Loading......

किनवट प्रतिनिधि ' / दि ' / ३१ '' / सर्व जाती धर्म समभावाची भावना सर्व समाजात टिकून राहावी असा अनोखा गणेश मंडळ किनवट शहरातील खाजगी वाहन चालक संघटनेच्या वतीने स्थापना करून पहिल्याच दिवशीची आरती संघटनेतील मुस्लिम बांधवांच्या हस्ते आरती करून एक आगळावेगळा संदेश आज सर्व वाहन चालकांनी दिला

  किनवट शहरातील दुर्गा मैदानात खाजगी वाहन चालक संघटनेच्या वतीने गणेश मंडळाची स्थापना करून आज सायंकाळी श्री प्रतिमेचे पूजन महाआरती आयोजन केले होते यावेळी 

किनवट शहरातील व तालुक्यातील अनेक वाहन चालक यावेळी उपस्थित होते याच सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित येऊन हा गणेश उत्सव साजरा करीत आहे

 या मंडळाचे अध्यक्ष अनिल राठोड उपाध्यक्ष संजय फड  सचिव नंदू धावरे कोषाध्यक्ष महबूब शेख व कार्यकारणी मध्ये कृष्णा बोईनवाड मंगेश जाधव प्रफुल राठोड बंटी फड किशोर कांबळे नदीम शेख संतोष नाईक अजर शेख सेवालाल जाधव गजानन काळे आधी सह अनेक चालक या मंडळात समाविष्ट आहेत

 आज सायंकाळी प्रथम पूजेच्या दिवशी वाहन चालक सजील शेख रुउफ चव्हाण अक्रम शेख या मुस्लिम बांधवांच्या हस्ते  महारती करून 

सर्व जाती धर्माच्या लोकांना एकतेचा संदेश आज देण्यात आला किनवट शहराची शांततेची परंपरा कायम ठेवण्याचे काम आज वाहन चालक संघटनेच्या वतीने होताना दिसून आले