दैनिक नंदगिरीचा कानोसा सह-संपादक पदी पत्रकार आनंद भालेराव यांची नियुक्ती
किनवट/प्रतिनिधी: किनवट येथील किनवट टुडे न्युज युट्यूब चॅनल चे संपादक श्री आनंद भालेराव यांची "दै.नंदगिरीचा कानोसा" च्या सह-संपादक पदी "दै.नंदगिरीचा कानोसा"चे संपादक मारोती शिकारे यांनी नियुक्ती केली आहे.
श्री आनंद भालेराव हे पत्रकारितेच्या क्षेत्रात गेल्या पंचवीस वर्षापासून कार्यरत आहेत त्यांचे सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातील कार्य पाहता त्यांची नांदेड जिल्ह्यातून निघणाऱ्या दैनिक "नंदगिरी चा कानोसा" च्या सह-संपादक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेच्या अन्यायाला वाचा वाचा फोडणार असल्याचे रस्त्याची त्यांनी सांगितले. अल्पावधीतच दैनिक नंदगिरीचा कानोसा महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पोहोचेल यासाठी प्रयत्न करू. यासाठी सर्व स्तरातील नागरिकांनी आमच्या प्रयत्नांना सहकार्य करावे.असे त्यांनी सांगितले.
