किनवट
हैदराबाद येथील चिन्ना जियआर स्वामी मंदिरात सत्संगासाठी जाणाऱ्या किनवट येथील महिलांच्या खासगी आराम बसला गुरुवारी (१३ ऑगस्ट) तेलंगणातील आरमूरजवळील गोविंदपूर (राष्ट्रीय महामार्ग ४४) येथे भीषण अपघात झाला. धावत्या बसचा टायर फुटल्याने घडलेल्या या दुर्घटनेत किनवट शहरातील दोन महिलांचा जागीच दुर्दैवी अंत झाला असून अनेक महिला जखमी झाल्या आहेत. हा अपघात केवळ नशिबाचा खेळ नसून आयोजकांचा अक्षम्य निष्काळजीपणा आणि स्थानिक मठात वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या हव्यासापोटी घडल्याचा खळबळजनक आरोप आता नागरिकांतून केला जात आहे.
या भीषण दुर्घटनेत भाजप नेते अशोक नेम्मानीवार यांच्या धर्मपत्नी सौ. सुजाता अशोक नेम्मानीवार (वय ५५) आणि पत्रकार किरण तिरमनवार (किनवटकर) यांच्या धर्मपत्नी सौ. माधवी किरण तिरमनवार (वय ४८) या दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, किनवट शहरातील वेलमापुरा, रामनगर, बेल्लोरी आणि मांडवा परिसरातील वेलमा समाजाच्या सुमारे ५० ते ६० महिला दोन खासगी ट्रॅव्हल्सने हैदराबादकडे रवाना . होत्या. भाविकांकडून या प्रवासासाठी ठराविक . वसूल करूनही आयोजकांनी प्रवाशांच्या सुरक्षेकडे . दुर्लक्ष केले. .
प्रवासासाठी वापरण्यात आलेल्या दोन्ही ट्रॅव्हल्स गाड्या अत्यंत निकृष्ट आणि हालाकीच्या स्थितीत होत्या. वाहनांचे फिटनेस आणि मेंटेनन्स योग्य नसतानाही महिलांचा प्रवास सुरू करण्यात आला. अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे ५०-६० महिलांच्या या जथ्यासोबत चालकांशिवाय एकही जबाबदार पुरुष मंडळी नव्हते.
गोविंदपूरजवळ धावत्या ट्रॅव्हल्सचा टायर फुटल्याने मोठा अपघात झाला. अपघातानंतर चालकाने निष्काळजीपणा दाखवत गाडीतील घाबरलेल्या महिलांना सुरक्षित स्थळी हलवण्याऐवजी थेट रस्त्याच्या धोकादायक डिव्हायडरवर बसवून ठेवले. अपघाताच्या भीषण प्रसंगानंतर घटनास्थळी मदतीसाठी आयोजकांपैकी कोणीही उपस्थित नव्हते; केवळ घाबरलेल्या आणि आक्रोश करणाऱ्या महिलाच तिथे होत्या.
आयोजकांनी जर योग्य दर्जाच्या गाड्या व्यवस्थापित केल्या असत्या आणि प्रवासादरम्यान योग्य काळजी घेतली असती, तर दोन निष्पाप महिलांचा जीव वाचला असता, असा संताप व्यक्त होत आहे.
आयोजकांच्या बेजबाबदार वृत्तीमुळे दोन कुटुंबे उघड्यावर पडली असून, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी आयोजकांवर व ट्रॅव्हल्स मालकावर कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी किनवटवासीयांकडून केली जात आहे.
