Ticker

    Loading......

किनवट शहरात गाढव राज सुरू झाले असून शहरात जिकडे तिकडे गाढवेच गाढवे दिसून येतात. तसेच या शहरात कुत्रे, डुक्करे, शेळ्या, गाई,म्हशी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर दिसून


किनवट शहरात गाढव राज सुरू झाले असून शहरात जिकडे तिकडे गाढवेच गाढवे दिसून येतात. 

तसेच या शहरात कुत्रे, डुक्करे, शेळ्या, गाई,म्हशी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर दिसून येतात.

 त्यामुळे माणसे कमी प्राणी जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 

त्यातच डुकरांची मस्ती, गाढवांची मस्ती, रस्त्यावर दिसून येत आहे 

त्यामुळे शहरात अपघाताच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

 किनवट येथील धडाडीचे पत्रकार लोकादेश चे संपादक साजिद बडगुजर यांचा अपघात गाढवा मुळेच झाला. त्यांना आपला एक पाय गमवावा लागला. 

पाय फॅक्चर झाल्यामुळे त्यांना यवतमाळ येथे हलवावे लागले त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया झाली असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर( चांगली )आहे