Ticker

6/recent/ticker-posts

kinwat जिल्हा उद्योग केंद्र आयोजित महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र नांदेड यांच्यातर्फे त्वचा व केस निगा कार्यक्रमाचे मोफत आयोजन


जिल्हा उद्योग केंद्र आयोजित महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र नांदेड यांच्यातर्फे त्वचा व केस निगा कार्यक्रमाचे मोफत आयोजन
किनवट (प्रतिनिधी)जिल्हा उद्योग केंद्र व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत त्वचा व केस कार्यशाळेचे दि. 16/12/2025 रोजी गोकुंदा तमन्ना ब्युटी पार्लर येथे  आयोजन करण्यात आले.
सदर कार्यशाळेस जिल्हा उद्योग केंद्राचे उद्योग निरीक्षक मा. अरविंद भांडे साहेब साहेब तसेच महाराष्ट्र उद्योजकता विकास (M.C.E.D.) चे अधिकारी विजय गायकवाड साहेब यांनी  मुलाखती घेतल्या.सदर कार्यशाळेत औद्योगिक धोरणे व व्यवसाय व शासनाच्या योजनांची माहिती देण्यात आली. तसेच दि. 17/12/2025 पासून S.T. प्रवर्गातील युवक व युवतींसाठी व्यवसायाबद्दल माहिती दिली व स्वतःच्या पायावर उभे राहून विविध व्यवसाय करता येते आणि जिल्हा उद्योग केंद्राकडून कर्जाची सुद्धा मदत केली जाते  ह्या बद्दल माननीय जिल्हा उद्योग केंद्राचे उद्योग निरीक्षक अरविंद भांडे साहेबांनी मार्गदर्शन केले व
 शासनाकडून मिळणाऱ्या प्रशिक्षणांच्या माध्यमातून उद्योग व्यवसाय सुरू करावा व या पुढेही शासनाकडून जिल्ह्यातील विविध योजनांद्वारे प्रोत्साहन देण्यात येईल असे आश्वासन दिले.
या कार्यक्रम प्रशिक्षण घेणाऱ्या तमन्ना ब्युटी पार्लर सेंटरच्या अध्यक्ष परवीन शेख यांनी सर्व महिलांना केस व सौंदर्य याची निगा कशी राखावी व आपला उद्योग व्यवसाय कसा सुरु करावा याबद्दल सविस्तर माहिती दिली  आपला अनुभव सांगितला.
कार्यक्रमाचे आयोजन मा. संजय गुंडेकर (M.C.E.D.) यांनी सर्वांचे आभार व्यक्त करून केले