Ticker

6/recent/ticker-posts

बिरसा मुंडा चौक गोकुंदा ते हबिब कॉलोनी रस्त्याचे काम त्वरित करा

बिरसा मुंडा चौक गोकुंदा ते हबिब कॉलोनी रस्त्याचे काम त्वरित करावे. 

*(उपविभागीय अभियंता यांना दिले निवेदन)*

किनवट:किनवट शहर गोकुंदा या भागाला महत्त्वाचा रस्ता म्हणून बिरसा मुंडा चौक ते सुभाष नगर चा नागरिक मोठ्या प्रमाणात वापर करत असतात परंतु या रस्त्यावर गेल्या अनेक वर्षापासून धूळ खडे चिखल यांचे अतिशय मोठ्या साम्राज्य पसरले आहे. याप्रकरणी गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने या भागातील व परिसरातील नागरिक या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी करत आहेत परंतु कोणाचेही या प्रकरणी लक्ष नसल्यामुळे या भागातील तरुणांनी एकत्र येत सदरील रस्त्याकरिता माननीय उपविभागीय अभियंता जिल्हा परिषद किनवट यांना सविस्तर निवेदन देऊन सदर रस्त्याचे काम तात्काळ सुरू करावे या मागणीकरिता निवेदन देण्यात आले आहे सदरील निवेदनावर शेख मोईन शेख मुख्तार, शेख शाहाजन निजाम खान, साहिल खान प्रमोद कोसरे, शेख रेहान, किरण वाठोरे,शेख जुनेद, सोहेल खान, दुर्गेश शेळके, शेख अकबर, धम्मपाल वाघमारे, रामराव पुनवटकर,शेख अलीम, शेख सरब्रार, शेख जाफर, शेख मोहम्मद गाणी आहेत