Ticker

    Loading......

किनवट तालुक्यातील घोटी येथिल जिल्हा परिषदेची शाळा रात्रीतुन जमिनदोस्त केल्याच्या विरोधात शाळा पाडणा-यांवर कारवाई करण्याच्या मागणीकरिता गटशिक्षणाधीकारी


किनवट ता.प्र दि १ तालुक्यातील घोटी येथिल जिल्हा परिषदेची शाळा रात्रीतुन जमिनदोस्त 

केल्याच्या विरोधात शाळा पाडणा-यांवर कारवाई करण्याच्या मागणीकरिता गटशिक्षणाधीकारी 

कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ते राजु लक्ष्मण 
सुरोशे, संतोष दत्ता मिराशे, उल्हास धरमा राठोड, 

सतिष मल्हाजी घुले, संजय शिवाजी गरड यांनी 

दिनांक १ मार्च पासुन आमरण उपोषण आरंभले आहे.
   

   या विषयी सविस्तर माहिती अशी कि, घोटी येथे जिल्हा परिषदेच्या शाळेची वर्गखोली 

बेकायदेशिर मार्गाने रात्रीतुन बुलडिजर लावुन पाडण्यात आल्याचे 

आरोप करत सदर प्रकरणी चौकशी करुन 

दोषींविरुध्द कारवाई करण्यात यावे 

याकरिता उभयंताकडुन दिनांक ८ फेब्रुवारी रोजी 

लेखी तक्रार करण्यात आली 

परंतु दिनांक २८ फेब्रुवारी पर्यंत सदर प्रकरणी 

कोणतीही कारवाई न झाल्याने तक्रारदार राजु लक्ष्मण सुरोशे, 

संतोष दत्ता मिराशे, उल्हास धरमा राठोड, सतिष 

मल्हाजी घुले, संजय शिवाजी गरड यांनी आमरण उपोषण आरंभले आहे.