किनवट:(तालूका प्रतिनिधी) 
            भारतीय जनता पक्षाच्या वतीने माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या वाढदिवस 
निमीत्त किनवट येथे दिनांक 26 रोजी सकाळी 11.00 वा. आमदार भीमराव केराम यांच्या मार्गदर्शनाखाली,
 प्रतिक केराम व तालुका अध्यक्ष संदीप केंद्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण व गोकुंदा 
उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.
   सध्या भारतामध्ये कोरोना प्रमाण कमी झाले नाही या व इतर सामाजिक बाबीला अनुषंगून  
यावर्षी अत्यंत साध्या पद्धतीने पंकजा मुंडे यांचा वाढदिवस किनवट साजरा करण्यात आला. 
यामध्ये विविध प्रकारच्या वृक्ष लावण्यात आले . तर किनवट येथील गोकुंदा स्थित उपजिल्हा  
रुग्णालय येथे रुग्णांना फळवाटप करण्यात आले.  
  या वेळी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, ओबीसी जिल्हा अध्यक्ष बाबूराव केंद्रे अ. जमाती 
जिल्हाध्यक्ष गोविंदा अंकुरवाड, अ .जमाती भाजपा नांदेड ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष , 
जितेंन्द्र अ . कुलसंगे , दत्तभाऊ आड़े, पस उपसभापती कपिल करेवाड , 
तालुका समन्वयक बाळकृष्ण कदम, संतोष मरसकोल्हे, नगरसेवक शिवाजी आंधळे, 
नरेंद्र सिरमनवार, विवेक केंद्रे, लक्ष्मन मुंजे,
 संतोष कन्नाके,
 इंद्रदिप वाघमारे, नरसिंग तक्कलवार, आकाश भंडारे, राजू दराडे आदी उपस्थित होते.?
