सेवा_यज्ञ....
*किनवट येथील #संथागार_वृध्दाश्रमात गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने फळे वाटप करून लोकनेत्या #पंकजाताईंचा_वाढदिवस_साजरा....
किनवट.
*दि.26.07.2021*
स्व. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान मार्फत लोकनेत्या पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या 
वाढदिवसाच्या निमित्ताने किनवट-माहूर मतदारसंघातील किनवटच्या संथागार 
वृध्दाश्रमात फळे वाटप करून संघर्षकन्या पंकजाताईचा वाढदिवस साजरा करण्यात आला....!
 सर्वप्रथम किनवट सारख्या दुर्गम, आदिवासी, डोंगरी भागात अथक परिश्रमांतून वृध्दाश्रम निर्माण करून 
चालविणारे ज्येष्ठ समाजसेवक तथा किनवट नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष मा. 
अरूण आळणे यांचा लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान मार्फत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते 
सत्कार करण्यात आला त्यानंतर वृध्दाश्रमातील सर्व वृध्द माता पित्यांना मान्यवरांच्या हस्ते फळे वाटप करण्यात आले. 
कार्यक्रमाच्या #अध्यक्षस्थानी संथागार वृध्दाश्रमाचे संचालक श्री अरूण दादा आळणे होते तर कार्यक्रमास 
प्रमुख_उपस्थिती म्हणून व्हिजन अॅकेडेमी तथा अॅम्बीशन कोचींग क्लासेस चे संचालक श्री झाकिर सर, 
भाजपाचे तालुका अध्यक्ष श्री संदीप दादा केंद्रे, किनवट न.प.चे नगरसेवक शिवाजीराव आंधळे, 
साप्ताहिक वंजारी पुकार चे संपादक श्री दत्ता जायभायेजी, 
टिपू सुलतान ब्रिगेड चे किनवट तालुका अध्यक्ष श्री शेख शाकिर भाई, समाजसेवक श्री कृष्णा जोशी सर,
 सहकारी मित्र श्री नागरगोजे सर, श्री ज्ञानेश्वर भाऊ फड, श्री गणेश डूम्पलू आदि मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते.*
कार्यक्रमाचे अध्यक्ष अरूण दादा आळणे यांनी #मनोगत व्यक्त करतांना परिसरातील 
निराधार गरजू वृध्द माता पित्यांना संथागार वृध्दाश्रमास पाठविण्याचे आवाहन केले.
