सायफळ  गावात मेन रोडवर उभारले लाईनचे खंबे दुरअवस्थेत 
 ग्रामपंचायती चे दुर्लक्षष म्हणावे की महावितरण कंपनीचे 
 *माहूर प्रतिनिधी-:राजीक शेख* 
 माहूर तालुक्यात असलेल्या सायफळ या गावात मेन रोडवर उभारलेले  लाईनचे खंबे मागील 3 वर्षापासून बंद  असल्याचे समोर येत आहे.
 पण मागील तीन वर्षापासून ग्रामपंचायत झोपा काढत आहे असे समोर येत आहे. कारण खाब्या वरचे तार एका मेकाला जुळलेले आहे. 
 तरी सायफळ गावातील ग्रामपंचायत आतापर्यंत काही कारवाई केलेली नाही. ग्रामपंचायतचे  म्हणणे आहे की 
अर्ज द्या गावकर्यांचे म्हणणे आहे की सरपंचाला दिसत नाही का  खाब्यावर चि तारे एकामेकाला जुळलेली त्याच्यातला
 एक खांब पडलेला मागील तीन वर्षापासून नुसते खांबे लावून ठेवलेले आहे. त्याच्यात एक खांब  वाऱ्याने पडून गेलेली आहे.
मेन रोडच्या बाजूला किराणा दुकान आहे दुकानात जायचे असले की अंधारातच जावे लागते रात्रीच्या वेळी 
एखाद्या म्हाताऱ्या माणसाला जर दुकानात जावे लागेल तर त्याला दिसत नाही गावकरांना मोठे संकट जगावे लागत आहे. 
गावकऱ्यांच म्हणणं आहे की दहा दिवसाच्या आत खंबे दुरुस्ती करून त्याच्यावर लाईट बसवण्यात यावे. 
सतत चालू असलेल्या पावसामुळे रस्त्यावर चिखल ही जमा झालेला आहे अशा वेळी अंधारात जावे लागतात. 
जंगल व माळ टेकडी शिवारात बसलेल्या सायफळ या गावासियांना खांब्या वरची लाईन बाबतमोठे संकट झेलावे लागत आहे. 
सरपंच यांचा कार्यकाळ संपला असून 
माजी सरपंच रामराव आडे यांनी आतापर्यंत ही महावितरन कंपनी ला कंप्लट 
किंवा ग्रामपंचायत तर्फे अर्ज दिलेला नाही आहे.
 *प्रतिक्रिया* 
सायफळ गावातील सरपंच रामराव आडे यांचा कार्यकाळ संपला असून
 त्यांच्या कार्यकाळात सायफळ गावात कोणतीही विकासकामे झालेली नाही.
 सरपंच रामराव आडे  यांच्या कार्यकाळात ग्रामपंचायत मध्ये कोण कोणती विकास कामे आली होती 
याची  चौकशी गट विकास अधिकारी यांनी करावी. 
 

 
   
   
   
