किनवट माहूर राष्ट्रीय महामार्ग बनला परंतु बस स्थानकाजवळील फुलावर दोन जास्तीच्या भिंती आहेत .जे की वाहन चालकास अचानक पणे निदर्शनास येत नाही . यामुळे जीवघेणा अपघात होत आहे गुत्तेदाराच्या हलगर्जीपणामुळे ह्या भिंती जीवघेण्या ठरत आहे .आज पर्यंत हा पाचवा अपघात असून ही भिंत अशाच प्रकारे राहिल्यास वारंवार अपघात घडून यामध्ये जीव जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही .
पुलावर सदरील दोन भिंतीचे कामच काय ?असा गंभीर प्रश्न निर्माण होत असून याबाबत नागरिकांची वारंवार भिंत काढण्याची मागणी व प्रसिद्धी माध्यमाच्या सतत बातम्या यामुळेही संबंधित गुत्तेदार याची झोप उडाली नसल्यामुळे आता सर्व जनतेने एकत्रित येऊन फुलावरील भिंत तात्काळ काढण्यास मजबूर करावे जेणेकरून समोर अपघात घडू नये याची आपणच दक्षता घेणे आवश्यक आहे