एस.एस.सी (दहावी) परीक्षेत जवाहर उल उलूम उर्दू शाळेचा 70.07 टक्के निकाल
किनवट प्रतिनिधी
माध्यमिक परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत किनवट सारख्या डोंगरी आदीवासी भागातील एकमेव जवाहर उल उलूम उर्दू शाळेने यावर्षी उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.या वर्षी शाळेचा निकाल 70.07% टक्के लागला असून गुणवत्तेत विद्यालयाने बाजी मारली आहे.
सुहाना अब्दुल उस्मान ह्यांने 88.60% गुणासह विद्यालयत सर्वप्रथम येणाचा बहुमान प्राप्त केला आहे तर शेख अबुजर शाहिद 88.40% गुणासह व्दितीय,कु.अलविया आसना शेख जावेद व अकसा माहीन सय्यद 86.80% गुणासह तृतीय क्रमांक पटकावला आहे.
एकूण 127 प्रविष्ठ विद्यार्थ्यांपैकी 89 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यालयाचा एकुण निकाल हा 70.07% एवढा लागला.