Ticker

6/recent/ticker-posts

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (ई.१२ वी) परीक्षेत महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय गोकुंदा,किनवटची गुणवत्तापूर्ण निकालाची परंपरा कायम !

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (ई.१२ वी)  परीक्षेत महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय गोकुंदा,
किनवटची गुणवत्तापूर्ण निकालाची परंपरा कायम ! 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी -मार्च २०२५ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) 
बारावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच राज्य शिक्षण मंडळाकडून ऑनलाईन जाहीर करण्यात आला.

यामध्ये मिलिंद शिक्षण प्रसारक मंडळ अंबाडी, व्दारा संचलित, महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय गोकुंदा किनवट ने याही वर्षी आपल्या उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखत शैक्षणिक आलेख उंचावत ठेवला आहे.

महाविद्यालयाच्या २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात विज्ञान शाखेतुन  एकुण ३९६ विद्यार्थी हे परीक्षेस प्रविष्ट होते. पैकी ३९३ विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले असून ९९.२४ टक्के निकाल  लागला.यामध्ये प्रथम श्रेणी (६०%पेक्षा जास्त) १०४,(७५%पेक्षा जास्त) ११ , (८०%पेक्षा जास्त) ०३ एवढे विद्यार्थी गुणानुक्रम उत्तीर्ण झाले. 

विज्ञान शाखेतुन सर्वाधिक गुण घेवून कु.मादसवार श्रध्दा व्यंकन्ना -८४.६७% ही प्रथम,मोदुकवार ओमसाई अवधुत  ८३.५० % हा व्दितीय तर कु.कुटे सोमित्रा बाळासाहेब हीने ८२.१७% गुण घेवून तृतीय क्रमांक  पटकावला आहे. 

कला शाखेतुन  एकुण २०४ विद्यार्थी हे परीक्षेस प्रविष्ट होते पैकी १६० विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले. ७८.४३ % टक्के निकाल हा कला शाखेचा लागला.यामध्ये प्रथम श्रेणी (६०%पेक्षा जास्त)  ४५ ,(७५%पेक्षा जास्त) ०३ , (८०%पेक्षा जास्त) ०२ एवढे विद्यार्थी गुणानुक्रम उत्तीर्ण झाले. 
कला शाखेतुन सर्वाधिक गुण घेवून कु.कवटे पायल विनायक -८२.८३% ही प्रथम,कु.चव्हाण साक्षी आनंद ८२.५०% ही व्दितीय दुधमल आदित्य ज्ञानोबा ह्याने ७६.००%  गुण घेवून तृतीय क्रमांक  पटकावला आहेविज्ञान शाखेतुन उद्यानविद्या शास्त्र या विषयात ढोले ओमकार रामचंद्र याने २०० पैकी २०० गुण प्राप्त केले आहे.कनिष्ठ महाविद्यालयाचा एकुण निकाल ९२.१६ %  एवढा लागला आहे.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल 
 संस्थेचे सचिव अभि.प्रशांत ठमके, कोषाध्यक्षा शुभांगीताई ठमके, मुख्याध्यापक तथा प्राचार्य प्रमोद मुनेश्वर ,उपप्राचार्य.राधेश्याम
जाधव, उपमुख्याध्यापक किशोर डांगे, पर्यवेक्षक प्रा.संतोष.बैसठाकुर,विज्ञान विभाग प्रमुख तथा पर्यवेक्षक रघुनाथ इंगळे, पर्यवेक्षक सुभाष सुर्यवंशी पर्यवेक्षक मनोज भोयर, व महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, आदींनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.