*किनवटच्या नगराध्यक्षपदाच्या राजकीय समीकरणात 'करण येंड्रलवार' केंद्रस्थानी — युवक नेतृत्व, विकासदृष्टी आणि समाजकार्याची नवी ओळख*
किनवट प्रतिनिधी, दि. 10 : किनवट शहरात नगरपरिषद निवडणुकीचे वारे जोर पकडत असताना, नगराध्यक्ष पद खुले प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित झाल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी तर्फे माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. सुजाता येंड्रलवार यांच्या उमेदवारीची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगू लागली आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या पुत्र करण येंड्रलवार यांच्या प्रभावी जनसंपर्क जाळ्यामुळे आणि समाजकारणातील सक्रिय भूमिकेमुळे या चर्चेला अधिकच बळ मिळत आहे.
युवकांचा करिष्मा आणि जनसंपर्काची ताकद, करण येंड्रलवार हे किनवटातील एक ओळखलेले उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध आहेत. शहरातील तरुणांमध्ये त्यांची मोठी लोकप्रियता असून, त्यांच्या नेतृत्वाखालील ‘करण येंड्रलवार मित्रमंडळा’ तर्फे राबविण्यात येणारे विविध समाजोपयोगी उपक्रम, मदतकार्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी शहरवासीयांच्या मनात विश्वास निर्माण केला आहे.
अतिवृष्टी आणि पुराच्या संकटाच्या काळात शहरात अडकलेल्या नागरिकांना त्यांनी तत्परतेने दिलेली मदत ही त्यांची संवेदनशीलता आणि नेतृत्वगुण दाखवणारी ठरली. त्यांच्या उपक्रमांची चर्चा केवळ किनवटपुरती मर्यादित न राहता संपूर्ण नांदेड जिल्ह्यात होत आहे.
सुशिक्षित, सुसंस्कृत आणि विधायक दृष्टिकोनाचा वारसा हा येंड्रलवार कुटुंबाची ओळख एक सुशिक्षित, सुसंस्कृत आणि समाजाभिमुख कुटुंब म्हणून आहे. सुजाता येंड्रलवार यांच्या सार्वजनिक जीवनातील अनुभवासोबत करण येंड्रलवार यांचे आधुनिक दृष्टिकोन, व्यावसायिक व्यवस्थापन कौशल्य आणि कार्यक्षमतेमुळे त्यांचे कुटुंब या निवडणुकीत एक बळकट पर्याय म्हणून पुढे येत आहे. राजकीय जाणकारांचे मत आहे की, “करण येंड्रलवार हे किनवटच्या विकासाचा नवीन चेहरा ठरू शकतात."
महाविकास आघाडीचा सर्वात मजबूत दावा? कारण भारतीय जनता पक्ष व्यतिरिक्त महाविकास आघाडीच्या तर्फे येंड्रलवार कुटुंबाचा दावा सर्वात बळकट असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. शहरातील विविध समाजघटक, व्यापारी वर्ग, महिला मंडळे आणि युवक वर्ग यांच्यामध्ये या कुटुंबाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
“शहराला नवे नेतृत्व हवे आहे” — नागरिकांची अपेक्षा
शहरातील अनेक नागरिकांचे मत आहे की, किनवटच्या विकासासाठी नवा, ऊर्जावान आणि विधायक नेतृत्व आवश्यक आहे. करण येंड्रलवार यांच्यात ती उमेद आणि दिशा दिसत असल्याने नागरिक त्यांच्याकडे आशेने पाहत आहेत.