मांडवी/ किनवट (प्रतिनिधी)- सकारात्मक विचार, कामाबाबत प्रामाणिकता व मेहनतीची तयारी ठेवल्यास यश निश्चितच आपल्या भोवती घिरड्या घालते असे मत कु. ज्ञानदा चतुरंग कांबळे यांनी व्यक्त केले.
खात्याअंतर्गत परीक्षा देऊन उत्तीर्ण झाल्याने जरूर येथील शाखा डाकपाल कु. ज्ञानदा चतुरंग कांबळे यांची मुंबई येथे पदोन्नतीवर "बहुकार्य सेवा कर्मचारी" एम.टी.एस. म्हणून बदली झाली त्यांना आज मांडवी उप डाकपाल कार्यालयाकडून निरोप देण्यात आला त्याच्या उत्तरात त्या व्यक्त होत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उप डाकपाल सुरेश वाघमारे हे होते.
यावेळी सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने पळशीच्या ज्येष्ठ शाखा डाकपाल सौ.तुळसाबाई पुसनाके यांचे हस्ते ज्ञानदाचा सत्कार करण्यात आला तेव्हा " ज्ञानदा मोठी अधिकारी होऊन आपल्या भागात मी सेवानिवृत्त होण्यापूर्वी याव " अशी अपेक्षा त्यानी व्यक्त केली.
अत्यंत कमी कालावधीत व कमी वयात ज्ञानदाने डाक सेवा चोखपणे निभवत अभ्यासात खंड न पडू दिल्याने आज ती अतिदुर्गम जरूर येथून अति विकसित राज्याची राजधानी असलेल्या मुंबईला जात आहे याचा मला सार्थ अभिमान वाटतो वयोमानाप्रमाणे ती नक्कीच अधिकारी होऊन स्वजिल्ह्यात येईल असा आशावाद कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सुरेश वाघमारे यांनी व्यक्त केले.
ह्यावेळी दिनेश दासरवार सह सर्व शाखा डाकपाल दरसावंगीचे अस्मित वाघमारे,जवारला रवि दासरवार, कनकी धिरज लखन राठोड, खबाळा नरसय्या पदकंठवार, कोठारी राहुल भुरे, लिंगी पोचन्ना अटलावार, नागापूर धर्मेंद्र ठाकूर,निराळा अनिता सेगेवाड,पळशी तुळसाबाई पुसनाके, पाटोदा गजानन पांडे, पिंपळगाव गोदाजी पोलासवार, रायपूर तांडा रमेश दासरवार, सक्रु नाईक तांडा रामराव पिटलावार, सिगोडा गंगन ना वेडंटी, उमरी करण चव्हाण, उनकदेव संतोष नदीकोंडावार, निवृत्त डाक सेवक स्वामी दासरवार ईत्यादी उपस्थित होते.
