Ticker

6/recent/ticker-posts

किनवट शहराच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर; आ. भीमराव केराम यांच्या पाठपुराव्याला यश*_भाजपा मंडळाध्यक्ष स्वागत आयनेनिवार यांची माहिती_

*किनवट शहराच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर; आ. भीमराव केराम यांच्या पाठपुराव्याला यश*

_भाजपा मंडळाध्यक्ष स्वागत आयनेनिवार यांची माहिती_

किनवट (प्रतिनिधी) : किनवट शहराच्या विविध विकासकामांसाठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडून वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत तब्बल ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. शहरातील विकासाच्या बाबतीत सर्वसमावेशक आणि समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन चालण्याच्या आमदार भीमराव केराम यांच्या विकासात्मक दृष्टिकोनातून हा निधी मंजूर झाला असून, शहरातील विविध नागरी सुविधांच्या विकासाला यामुळे चालना मिळणार आहे. किनवट शहरातील विकासकामांना शासनाकडून निधी मंजूर झाल्याची माहिती भाजपाचे किनवट मंडळ अध्यक्ष स्वागत आयनेनिवार यांनी माध्यमांना दिली. नेहमीप्रमाणेच लोकप्रिय, विकास पुरुष माननीय आमदार भीमरावजी केराम साहेबांचे किनवट शहराच्या विकासासाठी विशेष प्रयत्न दूरदृष्टी ठेवून विकास कामे मंजूर केली असे त्यांनी माध्यमांशी चर्चा करताना सांगितले. मंजूर निधीमधून शहरात विविध सहा विकासकामे हाती घेण्यात येणार आहेत. यामध्ये आरक्षण क्रमांक ३० येथील शॉपिंग सेंटर इमारतीत विद्युतीकरणासाठी ५० लाख रुपये, नगरपरिषदेच्या जागेवर अभ्यासिका बांधण्यासाठी १ कोटी रुपये, प्रभाग क्रमांक ८ मध्ये भोई समाजासाठी समाजमंदिर बांधण्यासाठी ३० लाख रुपये, प्रभाग क्रमांक ४ मधील बौद्ध समाज मंदिराच्या उर्वरित कामासाठी २० लाख रुपये, प्रभाग क्रमांक ५ मधील आर्य वैश्य कॉलनी येथे सभागृह बांधण्यासाठी ५० लाख रुपये, तर शहरात आवश्यक ठिकाणी स्ट्रीट लाईट व पोल बसविण्यासाठी २ कोटी ५० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने १९ नोव्हेंबर २०२६ रोजी शासन निर्णय काढून या निधीस मंजुरी दिली आहे. या सर्व कामांची अंमलबजावणी किनवट नगरपरिषदेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.  आमदार भीमराव केराम यांच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी निधी उपलब्ध झाला आहे. आगामी काळातही किनवट शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे भाजप मंडळ अध्यक्ष स्वागत आयनेनिवार यांनी सांगितले.