किनवट प्रतिनिधि/ दि २९ = मराठवाडा ही कै.शंकरराव चव्हाण यांची कर्मभूमी!  त्यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्षाशी  एकनिष्ठ राहून राज्याचे माजी मुख्यमंत्री  अशोकरावजी चव्हाण साहेब 
यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन नगराध्यक्षपद,  
पत्रकार संघाचे अध्यक्षपद,  लायन्स क्लबचे अध्यक्षपद यासह स्थानिक स्वराज्य संस्थेत अनेक पदावर राहून 
सामाजिक बांधिलकी जोपासत जनहितासाठी झटणारे किनवट तालुका पत्रकार संघाचे मुख्य सल्लागार तसेच पत्रकार संघटनेचे मार्गदर्शक 
के. मूर्ती यांना आगामी होऊ घातलेल्या मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी 
काँग्रेस पक्षाची उमेदवारी देण्याची मागणी निवेदनाद्वारे काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे केली आहे.
 आगामी होत असलेल्या मराठवाडा  पदवीधर 
मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने किनवटचे माजी नगराध्यक्ष,  काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ 
के. मूर्ती यांनी नुकतीच मराठवाड्यातील अनेक पदवीधर मतदारांची संपर्क साधून आपली भूमिका त्यांच्यासमोर मांडून होत असलेल्या या 
निवडणुकीत मला  काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळाल्यास निवडणूक लढविणार असल्याचे सांगितल्याने 
त्यांच्या या विचाराला अनेकांनी प्राधान्य देत तुम्ही काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी आणा  
आम्ही बीनशर्थ  तुमच्या पाठीशी उभे राहू असा विश्वास दिल्याने 
के. मूर्ती पक्षातील काही प्रमुख नेत्यांसी  याबाबत चर्चा केली असता त्यांनीही सहमती दर्शविली आहे
ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेऊन
 के . मूर्ती हे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे आपल्या समर्थकांसह भेट देऊन उमेदवारी मागणीचे निवेदन देणार असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले.
 तसेच राज्याचे काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात व महाराष्ट्र राज्याचे पक्षाचे प्रभारी एस के पाटील यांच्याशी लवकरच भेट घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगितले.
 के. मूर्ती यांना त्यांच्या चाळीस वर्षाच्या पक्षाच्या योगदानाची दखल घेऊन उमेदवारी दिल्यास 
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांसमोर के. मूर्ती यांचे मोठे आव्हान उभे  राहू शकेल
 अशी चर्चा किनवट तालुक्यात सुरू आहे.
 

 
   
   
